Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात सेवानिवृत्त जवानाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
दत्तात्रय दिलीप बारहाते (वय ४२) रा. कोळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह फरार झाला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण दत्तात्रय बारहाते हे नगर येथे राहण्यास असून. शनिवारी (दि.२) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोळगाव येथे नातेवाईकाच्या दशक्रियेनिमित्त नगर दौंड महामार्गवरून येत असताना
चिखली परिसरात नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने ओव्होरटेकिंगच्या नादात समोरून दुचाकीवरून येणाऱ्या बारहाते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात दत्तात्रय बारहाते यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. या बाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.