अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेचे पहिले आयुक्त बी.डी.सानप यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 71 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व.बी.डी.सानप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर 2000 साली त्यांनी प्रथम आयुक्त म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. मनपाच्या प्रशासकिय कामकाजाची संपुर्ण माहिती पदाधिकारी व कर्मचार्यांना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यांच्या निधनाने नगरमधून शोक व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम