व्यापार्‍यास जीवे मारण्याची धमकी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- तक्रार मागे घेण्यासाठी व्यापार्‍याला रस्त्यात अडवून दमदाटी केली. तसेच परिवाराचे तुकडे करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल महेंद्र पोटे (रा. प्रेमदान हाडको, सावेडी, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. व्यापारी अजय राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

ते प्रेमदान हाडको येथील अजय शॉपी किराणा दुकानात असताना पोटे याने सत्तुर घेवून ‘तू माझ्या विरूध्द केलेली तक्रार मागे घे, नाहीतर माझ्या हातातील सत्तुरने तुझ्या परिवाराचे तुकडे तुकडे करून टाकतो’,

अशी धमकी देत राऊत यांच्या खिशातील एक हजार रूपये व मोबाईल बळजबरीने काढून घेतला. तसेच तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe