कर्जबाजारीपणामुळे व्यथित शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे याने कर्जबाजारीपणाला कंटाळून घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू घोरपडे यांनी वैजू बाभूळगाव सेवा सोसायटी, विविध बँका व फायनान्सकडून शेती, तसेच व्यवसायासाठी कर्ज घेतले होते.

परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत त्यांना मोठे नुकसान झाले. तसेच व्यवसायालाही फटका बसला. दुसरीकडे बँकांकडून कर्जाचा हप्त्यासाठी तगादे सुरूच होते.

कर्जबाजीपणास कंटाळून घरातील सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर त्यांनी पडवीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काही वेळातच घरच्यांच्या लक्षात ही बाब

येताच त्यांनी व शेजाऱ्यांनी घोरपडे यांना तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. वैजू बाभूळगाव येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News