जेलचे गज कापून मोक्कातील आरोपींचे पलायन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-   राहुरी जेल मधुन मोक्का गुन्ह्यातील पाच आरोपी फरार घटना घडली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.(Ahmednagar crime) 

मोका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सागर भांड टोळीतील पाच आरोपींना राहुरी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री जेलच्या मागिल बाजुच्या खिडकीचे गज कापुन फरार झाले आहे.

पोलिसांनी तात्काळ पथक नमून त्यांचा शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता त्यापैकी दोघांजणा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

तिघे माञ पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत पोलिसांना नाकाबंदी करुनही पोलिसांच्या हाती तीन आरोपी लागले नाही. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोऱ्या, दरोडे, अपहरण ,

हाणामाऱ्या आदी घटना वाढल्या असताना मोक्का गुन्हयातील आरोपी जेलचे गज कापून पलायन करतात यामुळे राहुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी पुन्हा एकदा जोरदार चर्चेला उधाण आले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe