रिक्त मंत्रीपदी आ. संग्रामभैय्या जगतापांची वर्णी लागावी अजितदादांकडे ‘अहिल्यानगर’ची मागणी

Published on -

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा खाते रिक्त झाले आहे, या जागी अहिल्यानगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांची वर्णी लागावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातून अजितदादा पवाराकडे होत आहे.

आमदार संग्रामभैय्या जगताप यांना अन्न नागरी पुरवठा मंत्रीपद दिल्यास ते पक्ष वाढीसाठी राज्यात फायदेशीर ठरणार आहे, त्यांच्या कामात सर्वसामान्यांना सामावून घेऊन प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे ते प्रत्येकाला आपलेसे करतात. यामुळेच अजितदादा पवारांनी अहिल्यानगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांची रिक्त मंत्रीपदी वर्णी लावावी, अशी मागणी होत आहे.

महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वात पहिली नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून समोर आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी राजीनामा देण्याचा दबाव वाढला आणि अखेर तीन महिन्यांनी, दि.४ मार्च रोजी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला.

मुंडेंच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन शब्दात प्रतिक्रिया दिली. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला, असे ते म्हणाले.धनंजय मुंडेचा राजीनामा होऊन आता आठ दिवस झाले आहेत, मात्र धनंजय मुंडेंची जागा राष्ट्रवादीने भरलेली नाही. अन्न आणि नागरी पुरवठा खाते कोणाकडे जाणार याची चर्चा आता सुरु झाली आहे.

यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातून आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या रिक्त मंत्रीपदी अजितदादा पवार यांनी करावा, अशी मागणी केली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार संग्रामभैय्या जगताप यांची वर्णी अजितदादा पवारांनी लावली तर, त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात वाढीस होईल. त्यांचा तळागाळातील सर्वसामान्यांबरोबर असणारे विश्वासाचे संबंध निश्चित फायदाच होईल. अन्न, नागरी पुरवठा खाते हे प्रत्येक सर्वसामान्यांशी निगडीत आहे, त्यामुळेच आमदार जगतापांना रिक्त मंत्रीपदी वर्णी लावून दक्षिण अहिल्यानगरला सेवेची संधी द्यावी, अशी मागणी अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe