ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीची स्वच्छता करण्याची मागणी इतर दफनभूमीत जागा शिल्लक नसल्याने समाजबांधवांची प्रशासनाला हाक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोनामुळे दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढल्याने ख्रिश्‍चन समाजाच्या सिद्धार्थनगर येथील दफनभूमीत जागा शिल्लक दफनविधीसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.

महापालिकेच्या वतीने ख्रिश्‍चन समाजाला नालेगाव, वारुळाचा मारुती येथे देण्यात आलेल्या दफनभूमीच्या जागेची स्वच्छता करुन वारण्यायोग्य करण्याची मागणी बायबल बॅप्टिस्ट फेलोशिप चर्चच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन चर्चच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेत दिले.

यावेळी चर्च कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब वडागळे, उपाध्यक्ष संदीप पवार, सचिव अनिल ससाणे, खजिनदार लूकस वाघमारे, पास्टर दाविद ससाणे, जोसेफ वैरागर, प्रमोद खरात, विशाल वडागळे, संजय पवार, रावसाहेब औचिते, राजू शेलार, श्याम वैरागर, आकाश काळोखे, अक्षय ससाणे,

अमोल साठे, मनोज वाघमारे आदी उपस्थित होते. शांतीपूर लालटाकी येथील बायबल बॅप्टिस्ट फेलोशिप चर्चची स्थापना 1959 साली झाली. सदर चर्चचे सभासद हे शांतीपूर, लालटाकी, सिद्धार्थनगर, रामवाडी आदी शहरातील विविध भागात वास्तव्यास आहेत.

या सभासदांचे आजतागायत दफनविधी हे ख्रिस्ती विधीप्रमाणे सिद्धार्थनगर दफनभूमीत करण्यात आलेले आहेत. याकामी वेळोवेळी अहमदनगर पहिली मंडळी (कॉग्री) या चर्चचे सहकार्य लाभले. सदरील दफनविधीस कधीही अडचण आली नाही.

मात्र सध्या कोरोनाने दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. तर सिद्धार्थनगर दफनभूमीचे एकंदरीत क्षेत्रफळ पाहता या दफनविधीसाठी सध्या जागा शिल्लक राहिलेली नाही. ख्रिस्ती समाजाच्या विधीनूसार मयतांचे अंत्यविधी करण्यासाठी अडचणी येत आहेत.

यामुळे समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. ख्रिस्ती समाजासाठी महापालिकेने नालेगाव, वारुळाचा मारुती येथे सर्व्हे नंबर 221/2 येथे तीन एकर जमीन दफनविधीसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

मात्र सदर जागेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. प्रशासनाने ही जागा स्वच्छता करुन दफनविधीसाठी वापरण्यायोग्य करुन दिल्यास त्याचा वापर करता येणार असून, मृतदेहाची हेळसांड होणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News