अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- शेवगाव येथे शुक्रवारी, १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला.
या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने दुकानातील खरेदी करून ठेवलेले सोयाबीन,
उडीद, गहू, ज्वारी आदी धान्य भिजले. यमाध्ये व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्या दुकानातील धान्याचे पंचनामे करण्यात आले.
यामध्ये धान्य खरेदी-विक्री व्यापारी संघटनेचे मनोजकुमार तिवारी, गौरव बलदवा, प्रमोद वडकर, पुरुषोत्तम बिहाणी, खेडकर, शर्मा,
पुरुषोत्तम धूत आदी व्यापाऱ्यांच्या मालाची हानी होऊन लाखोंचे नुकसान त्यांना सहन करावे लागले. व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम