शिर्डी विमानतळावर शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-   नुकतीच राज्यात शिवजयंतीचा उत्साह साजरा झाला. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवावा अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे काकडीच्या ग्रामस्थांच्या वतीने युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी विमानतळावर केली आहे.

दरम्यान याबाबत मंत्री आदित्य ठाकरेंना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, राहाता तालुक्यात महाराजांचा अतिरिक्त पुतळा गोडावून मध्ये बंदीस्त आहे.

तो पुतळा काकडी येथील विमानतळाच्या परिसरात बसवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरात बसविल्यास विमानतळाच्या वैभवात भर पडेल. आठ दिवसापुर्वी ना. गुलाबराव पाटील यांचेकडेही अशाच आशयाचे निवेदन विमानतळावर देऊन मागणी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe