अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांना नव्याने उभे राहणे जिकरीचे आहे. आता आगामी सण उत्सव पाहता त्यांना मदतीची गरज आहे.
त्यामुळे दिवाळीच्या सणासाठी शासनाने रेशनवरील अन्न सुरक्षा कार्डधारकांना पाम तेल, साखर व हरभरा डाळ देण्यात यावे अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी केली आहे.
अनेकांच्या हाताला काम नसल्याने लोक हैराण आहेत. गोरगरिबांची दिवाळी चांगली होण्यासाठी सणासुदीच्या काळात काही आवश्यक वस्तू शासनाने रेशनवर उपलब्ध करून द्याव्यात.
अन्न सुरक्षा कार्डधारक लाभार्थ्यांबरोबरच केशरी कार्डधारकांनाही या वस्तू रेशनवर मिळाव्यात, तरच सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे.
याबाबत लवकरच पक्षातर्फे प्रांताधिकार्यांना एक निवेदन देण्यात येणार आहे. तसेच अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या मागणीबाबत पाठपुरावा करणार असल्याचे हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved