Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एक बोगस डॉक्टर वैद्यकीय परवाना तसेच डिग्री नसताना देखील खेड्यापाड्यातील भोळ्या भाबड्या लोकांवर चुकीचे उपचार करून जीवाशी खेळत असल्याने या तोतया डॉक्टरावर कायदेशीर कारवाई करावी,
अशी मागणी शेवगाव येथील शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंचाचे पदाधिकारी तसेच संस्थापक, अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील बोगस एका डॉक्टरकडे वैद्यकीय परवाना तसेच डिग्री नसतानादेखील खेड्यापाड्यातील भोळ्या भाबड्या नागरिकांवर चुकीचे उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहे.
या डॉक्टरने पाथर्डी तालुक्यातील मोहरी या गावातील एका महिलेला चुकीचे इंजेक्शन दिल्यामळे साईड इफेक्ट झाल्याने सदर महिलेवर सध्या अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
त्यामुळे सदरील बोगस वैद्यकीय सेवा देण्याऱ्या तोतया डॉक्टरवर कायदेशीर कारवाई कराव. या वेळी शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंचाचे संस्थापक, अध्यक्ष अशोक शिंदे, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुनिलभाऊ सकट, महिला आघाडीचे अध्यक्षा उषाताई शिंदे, विशाल केदारी, सुभाष क्षेत्रे, आदी उपस्थित होते.