आरोपींना फाशीची शिक्षा देऊन, दोषी पोलीस अधिकार्‍यांना सहआरोपी करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सुनिल शिंदे, दिलीप साळवे, सागर चाबुकस्वार, सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, जीवन कांबळे, संदीप गायकवाड, हनिफ शेख, सुनिल गट्टाणी, सिध्दार्थ घोडके,

विजय गायकवाड, अक्षय भिंगारदिवे, सचिन बडेकर, भूषण कांबळे, अक्षय पाथरिया, रुपेश बनसोडे, हिरा पाडळे, प्रविण कांबळे, राहुल कांबळे, सूरज बोरुडे, अच्युत गाडे, सागर गायकवाड, अक्षय गायकवाड, दादासाहेब पाडळे, विलास साळवे, प्रा.सोनटक्के आदि सहभागी झाले होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्‍या दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. आपल्या आईसोबत तरुणी शेतात चारा गोळा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून, पाठीच्या कण्याचे हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगढच्या जेएन मेडिकल रुग्णालय व सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या पीडित तरुणीची प्राणज्योत माळवली. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.

तर पोलिसांनी पीडितेचा मृतदेहावर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार केला. या घटनेचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणातील पोलीसांची भूमिका संशयास्पद असून,

संबंधीत पोलीस अधिकारी यांना दोषी धरुन त्यांना सहआरोपी करण्यात यावे, पिडीत तरुणीला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास इंपिरीयल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सर्व समाजबांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment