अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- केंद्र शासनाच्या धोरणांना विरोध आणि राज्य सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज झेडपीसमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी निदर्शने केली. दरम्यान देशातील विविध संघटनांनी आज एक दिवसांचा संप पुकारला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या… कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांना काम करताना सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, कोविड सेवेसाठी अधिकचा मोबदला मिळावा आणि थकीत मोबदला तातडीने अदा करावा, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.
१७ जुलै २०२० रोजी राज्य निधीतून आशा सेविकांसाठी २ हजार तर गटप्रवर्तकांना ३ हजार रूपये मोबदला वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने केला. मात्र एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ अखेर हा मोबदला दिला नाही.
तो तातडीने अदा केला जावा. २३ जून २०२१ रोजी आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आशा सेविकांसाठी १ हजार तर गटप्रवर्तकांना १२०० रूपये मानधन वाढ व कोविड भत्त्यात ५०० रूपये वाढ करण्याचे ठरले होते.
ही वाढ दिवाळीपूर्वी देण्यात यावी. १ एप्रिलपासून आशा सेविकांचा ७२ कामांचा मोबदला थकीत आहे. तो त्वरीत अदा केला जावा, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संघटनेने दिली.
दरम्यान आज झेडपीसमोर निदर्शने करण्यात आले. संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या संपात नगर जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना सहभागी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम