वंचित बहुजन आघाडीचा शेवगाव नगर परिषदेवर मोर्चा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी च्या मार्गदर्शनाखाली शेवगाव नगर परिषदेच्या कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.(Vanchit Bahujan Aghadi)

यावेळी सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला,

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात हजर होते, यावेळी घंटानाद ही करण्यात आला.

यावेळी कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कर्मचारी सेवा जेष्ठता यादी व ज्येष्ठ कर्मचारी याप्रमाणे प्रसिद्ध करावी, कर्मचारी सेवा जेष्ठता यादी प्रमाणे कर्मचाऱ्यांचा समावेश असून प्रस्ताव तात्काळ मंजूरी करता वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा,

कर्मचारी रिक्त पदे सेवाजेष्ठता कर्मचारी प्रमाणे भरण्यात यावी, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आठ दिवसाच्या आत देण्यात यावे, अशा विविध स्वरुपाच्या मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe