उसने पैसे परत देऊनही भाच्यांची आत्यासह मुलांना बेदम मारहाण करून दिली ‘ही’ धमकी

Ahmadnagar News : असे म्हणतात कि खऱ्या नात्यांची किंमत संकटात किंवा अडचणीच्या काळात होते. कारण यावेळी आपले कोण अन परखे कोण हे समजते. याची यची देही यचि डोळा प्रचीती एक महिलेस आली आहे.

दवाखाण्यासाठी घेतलेले पैसे वेळोवेळी परत करूनही वारंवार पैशाची मागणी करत मी तुमचे पैसे दिले आहेत. यापुढे पैसे मिळणार नाहीत असे सांगितल्याचा राग आल्याने सख्या भाच्यांनी आत्याला व तिच्या मुलांना बेदम मारहाण केली.

याबाबत पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकणी घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देवळाली प्रवरा हद्दीत एका विवाहीत महिलेने भाच्यांकडून वैद्यकीय कामासाठी उसने पैसे घेतले होते. ते पैसे परत देऊनही तीघांनी पैशाची मागणी करत महिलेसह तिचा मुलगा व मुलगी यांना बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारदार महिला छाया मोहन साळुंके, गणेशनगर, देवळाली प्रवरा यांनी ज्ञानेश्वर खंडू धुमाळ, कृष्णा विनायक धुमाळ, भानुदास भाऊसाहेब गोंडे यांच्याकडून वैद्यकीय कारणासाठी १ लाख रुपये उसने घेतले होते. त्यांनी ती रक्कम अदाही केली.

परंतु अजून पैशाची मागणी होत होती. छाया साळुंके या ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कामावर जात असताना भानुदास भाऊसाहेब गोंडे, ज्ञानेश्वर खंडे धुमाळ, संगिता ज्ञानेश्वर धुमाळ, राजूबाई विनायक धुमाळ, पुजा कृष्णा धुमाळ, मिरा भानुदास गोंडे, कृष्णा विनायक धुमाळ (सर्व रा.गणेशनगर, देवळाली प्रवरा ता. राहुरी) यांनी अडवत पैशाची मागणी केली.

याप्रसंगी साळुंके यांनी सांगितले की, मी तुमची घेतलेली रक्कम पूर्ण दिली आहे. तरीही तुम्ही आमची गाडी घेऊन गेलात. अजून तुम्हाला पैसे देणार नाही असे सांगताच आरोपींनी छाया साळुंके, मुलगा रोहित व मुलगी पुनम यांना लाथाबुक्यांनी जोरदान मारहाण, शिविगाळ व दमदाटी दिली.

आमची तक्रार पोलिस स्टेशनला दिली तर तुम्हाला जिवंत मारून टाकू असा दम दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe