अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन व मागील काही दिवसांपासून होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक आण्णा हजारे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही.

कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिल्याचा दावा कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली असल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची आंदोलकांची मागणी आहे.
यासाठी काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हजारे यांची राळेगण येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम