कोपरगावमधील २.६० कोटींच्या विकासकामांना मान्यता, शहरातील या भागातील कामे होणार पूर्ण!

Published on -

कोपरगाव- शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

याबाबतची माहिती खुद्द आ. आशुतोष काळे यांनी दिली. या निधीतून शहरातील रस्ते, गटारे आणि पेव्हर ब्लॉक बसवण्यासारखी अनेक कामे मार्गी लागणार आहेत, ज्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

आ. काळे यांनी कोपरगावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी शहराला मिळाला असून, त्यातून झालेल्या विकासकामांमुळे कोपरगावचा चेहरामोहरा बदलला आहे.

आता या नव्या २.६० कोटींच्या निधीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये नवीन सुविधा निर्माण होणार आहेत. शासनाच्या या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांमुळे कोपरगावकरांना मूलभूत सुविधांचा लाभ घेता येणार आहे. आ. काळे यांनी यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

या निधीतून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक १ मध्ये लक्ष्मण सपकाळ ते अजय गुप्ता यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि भूमिगत गटार बांधले जाणार आहे. शंकर कुमावत घर ते गजानन कदम घर रस्ता काँक्रीटीकरण व भूमिगत गटार करणे, कृष्णा आवारे घर ते गुंजाळ घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे, गिरमे घर ते कोपरे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे.

रसिक कोठारी घर ते गोरक्षनाथ घरापर्यंत साईड पेव्हर ब्लॉक वसविणे, जितेंद्र रणशूर घर ते अॅड. विद्यासागर शिंदे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.१० मध्ये दिलीप घोडके घर ते निकम घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, बालाजी अंगण घर ते किरण मवाळ घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, डॉ. आचारी हॉस्पिटल ते रोहित वाघ घरापर्यंत रस्ता साईडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे

अमोल पवार घर ते साक्षी किराणा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.७ मध्ये बिस्मिल्ला हॉटेल ते खंदक नाल्यापर्यंत भुमिगत गटार करणे, असलम शेख वखार ते जब्बार कुरेशी घरापर्यंत भुमिगत गटार करणे, मेहत्तर घर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, पाठक घर ते कासलीवाल कंपाऊंडपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.८ मध्ये एस.पी. औताडे घर ते बत्रा घरापर्यंत भुमिगत गटार करणे या सुद्धा कामांचा समावेश आहे.
तसेच चव्हाण घर ते तांबट घर भुमिगत गटार करणे, सादिक शेख घर ते देवकर घर भुमिगत गटार करणे, नगर-मनमाड महामार्ग ते इंगळे चर ते आयटीआय कॉलेज चर भुमिगत गटार करणे, सुनिता पवार घर ते अमजद सय्यद घर भुमिगत गटार करणे ही सुद्धा कामे मार्गी लागणार आहेत.

या सर्व कामांमुळे कोपरगावचा विकास निश्चितच नवी उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe