अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- अलीकडे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आता परत एकदा धूमधूमस्टाईलने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.
काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघा भामट्यांनी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबाडून घेवून पळून गेले.
ही घटना सावेडी समतानगर येथील त्रिमुर्ती मंदिरासमोर शनिवारी घडली. याप्रकरणी सुनंदा नवनाथ धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवले नगर येथील रहिवासी सुनंदा धुमाळ या शनिवारी पायी जात असताना त्याच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलरून आलेल्या
दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील २८ हजार रूपये किमतीच मिनी गंठण बळजबरीने ओढून पळून गेले.याबाबत धुमाळ यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून
याबाबत अधिक तपास मपोसई मोरे हे करत आहेत. या घटनेमुळे शहरात परत धुमस्टाईल चोरी करणारे सक्रीय झाल्याचे समोर आले असून यामुळे पोलिसांनी वेळीच त्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी पुढे येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम