राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात माजी आमदारांनी एक तरी बंधारा बांधला का ?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून दूरदृष्टी समोर ठेवून मुळा व प्रवरा नदीवर ७ केटी वेअर बांधून नदी काठाची शेती सुजलाम सुफलाम केली.

मात्र मंत्री राहिलेल्या माजी आमदारांनी पूर्वीच्या नगर व नव्याने झालेल्या राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात एखादा तरी केटी वेअर व साठवण बंधारा बांधला का? अशी टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव व प्रमोद तारडे यांनी माजी आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यावर केली आहे.

याबाचत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आढाव म्हणाले, कै. बाबुरावदादा तनपुरे यांनी मुळा धरण आणले, त्याच मुळा धरणावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मानोरी, मांजरी, डिग्रस, वांजुळपोई येथे बंधारे बांधून नदीकाठच्या शेतीला पाण्याची व्यवस्था केली. मानोरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच याच मुळा नदीवर

देसवंडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीवरून के टी वेअर मंजूर करून आणला, त्याचा सव्हेंपण करण्यात आला होता, त्यास कोणी विरोध केला होता? पुन्हा या नदीवर बंधारा होणे अशक्य असून तनपुरे यांनी बांधलेल्या बंधाऱ्यावर जलपूजनास विरोध करण्याच्या कोणताही नैतिक अधिकार नाही.

आढाव म्हणाले, त्यांनी आपल्या मतदारसंघात स्वतःच्या आमदारकीच्या काळात किती बंधारे व पाझर तलाव बांधले, याचा हिशोब त्यांनी जनतेला द्यावा, आपल्या भागाचे वाळवंट करून राहुरीच्या जनतेची खोट्या भुलथापा मारून दिशाभूल करणे थांबावे, माजी खासदार तनपुरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात मुळा व प्रवरा नदीवर तब्बल सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून तालुका सुजलम सुफलम केला.

समन्यायी पाणी वाटपामुळे जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासाठी आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतच माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जायकवाडीसाठी पाणी सोडताना तालुक्याचा लोकप्रतिनिधी या अधिकाराने राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीवरील सर्व बंधारे भरण्याची आग्रही मागणी केली होती.

त्यानुसार तालुक्यातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले, त्यांनी मीच पालकमंत्र्यांना फोन करून बंधारे भरून घेतले असा कांगावा केला. वास्तविक माजी आमदार फक्त राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे, म्हणून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ते तालुक्यात आ. तनपुरे यांनी मंजूर करून आणलेल्या मतदारसंघातील शासकीय कामांचे कोणताही नैतिक अधिकार नसताना भुमिपुजन व उ‌द्घाटन करीत फिरत आहेत,

ज्यांनी आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात सभामंडप, दिवे लावणे, मुळा धरणावर जाऊन कळ दाबून फोटोसेशन करणे या पलिकडे मतदारसंघात एकही भरीव काम केले नाही. त्यांना आता दुसऱ्याचे कामे आपणच मंजूर करून आणून कर्मयोगी असल्याचा साक्षात्कार होत आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार तनपुरे राज्यमंत्री असताना विकासकामांना भरीव निधी मंजूर करून घेतला, या कामांना स्थगिती देण्याचे पाप कोणी केले हे सर्वश्रुत आहे.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुळा नदीवर बांधलेल्या बंधा-यांमुळे या भागातील शेतीला पाणी मिळू लागल्याचे डॉ. राजेंद्र पोटे, नवनाथ थोरात, भाऊसाहेब आढाव, डॉ. चाबासाहेब आढाव, वैभव पवार, शिवाजी आढाव,

राजेंद्र आढाव, सदाशिव तारडे, बाळासाहेब चव्हाण, सुनील मोरे, मोहन खुरुद, कैलास झुगे, विष्णू तारडे, प्रभाकर म्हसे, श्रीरंग म्हसे, प्रकाश म्हसे, राहुल म्हसे, लक्ष्मण म्हसे, गहिनीनाथ पेरणे, इंद्रभान पेरणे आदींनी सांगितले,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe