दिलीप सातपुते पुन्हा शिवसेनेत ; एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश, ठाकरेंचे शिवबंधन तोडले

Mahesh Waghmare
Published:

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंदा येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ठाकरे सेनेत दाखल झालेल्या माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शिवबंधन तोडत आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलेले दिलीप सातपुते हे शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. नगर शहरातील राजकारणात सातपुते हे आमदार संग्राम जगताप यांचे विरोधक मानले जातात.

नगर शहरातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे सेनेत स्वागत केले.विधानसभा निवडणुकीत महायुतीत नगरची जागा राष्ट्रवादीला सुटली होती. पण सातपुते हे जगताप विरोधक असल्यामुळे त्यांनी पक्षाची अडचण नको म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सेनेत श्रीगोंदा येथील कार्यक्रमात प्रवेश केला होता.

मात्र, आता विधानसभा निवडणूक संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात दाखल झाले.सातपुते यांच्या प्रवेशामुळे केडगावमधील ठाकरे सेनेतील त्यांचे समर्थक व त्यांना माननारे आजी-माजी नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

केडगावसाठी आणणार निधी : सातपुते

महायुती सरकारमध्ये शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून केडगाव व नगर शहराच्या विकासासाठी भरीव विकास निधी आणणार असल्याचा निर्धार सातपुते यांनी पक्ष प्रवेशानंतर व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe