समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार अहमदनगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले होते. आता मुळामधून सोडलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता सामन्यायीचा कोटा पूर्ण झाला अन विसर्ग बंद केला. तब्बल पाच दिवस हा पाण्याचा विसर्ग सुरु होता. १ हजार ९६० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सडले गेले.
साठवण बंधारे भरून द्या :- मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजूळपोई साठवण बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे साठवण बंधाऱ्यावर फळ्या टाकण्याचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू झाले आहे. ते काम पूर्ण होताच बंधारे भरून दिले जातील. अनेक अधिकार्यांनी या फळ्या टाकण्याच्या कामाचे पाहणी केली.
कोणत्या साठवण्या बंधाऱ्यात किती पाणी ? धरणातील किती पाणी पुन्हा सोडावे लागणार?
डिग्रस बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ९४.०३ दशलक्ष घनफूट आहे. मानोरी बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १२५ दशलक्ष घनफूट, मांजरी बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १००.६३ दशलक्ष घनफूट,
वांजूळपोई बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १०७.५३ दशलक्ष घनफूट आहे. त्यामुळे हे चार बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मुळा धरणातील ४२७.१९ दशलक्ष घनफूट पाणी पुन्हा सोडावे लागेल.
पालकमंत्री विखेंकडे शेतकऱ्यांचे साकडे:- जायकवाडीला पाणी सोडल्याने मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजुळपोई हे पाणी साठवण बंधारे कमी झाले. फळ्या काढल्या गेल्या. परंतु आता हे बंधारे पुन्हा भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांकडे केली आहे.
त्यामुळे ४ बंधारे भरण्यासाठी बंधाऱ्यावर फळ्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे चारही बंधारे आता भरून दिले जातील असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांत देखील यामुळे समाधानाचे वातवरण आहे.