देवदैठण परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण सार्थक आणि मायंटीकल कंपनीचा उपक्रम

Mahesh Waghmare
Published:

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व परिसरातील ११ शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही व पेन यांचे वितरण करण्यात आले.

पुणे येथील सार्थक वेलफेअर फाउंडेशन व मायंटीकल प्रा. लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत परिसरातील शाळांमधील इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही व पेन यांचे वितरण केले.

देवदैठण , ढवळगाव , राजापूर , म्हसा , पिंप्री कोलंदर , अरणगाव , येवती , सुरेगाव , उक्कडगाव , उख्खलगाव व येळपणे अशा एकूण ११ शाळांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लागणार असून दहावीच्या शिक्षणासाठी या वस्तूंची विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यकता असते .

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे. सार्थक फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती नामजोशी या नेहमीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांमध्ये मदत करत असतात.

सार्थक फाउंडेशनचे स्वप्निल शेंडगे , अर्चना जोशी , पर्यवेक्षक नामदेव डुंबरे , क्रीडाशिक्षक संदीप घावटे , रमेश साळुंके , सतीश झांबरे ,अर्चना खंदारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe