‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशात बर्ड फ्लू या संकटाने कहर केला आहे. नुकतेच या संकटाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असतानाच या नव्या संकटाने प्रशासन पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे.

नुकतेच मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

या संकटाचा वाढत प्रादुर्भाव पाहता ‘बर्ड फ्ल्यू’च्या प्रतिसाद आणि प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

तसेच अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, राज्यात हाय अलर्ट देखील घोषित करण्याची गरज आहे, असं मत मांडलं आहे.

दरम्यान या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe