Ahmednagar News : ज्या नागरिकांच्या जन्म व मृत्यूची एका वर्षाच्या आत नोंद झालेली नाही, अशा व्यक्तीच्या जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून विहित फी भरल्यानंतर नोंदणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
नागरिकांच्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी आढळून येत नसल्याने जन्म व मृत्यूच्या नोंदीचा दाखला मिळण्यात नागरिकांना अडचणी येत होत्या. नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९७९ (सुधारणा अधिनियम २०२३३) कलम १३ (३) तरतुदीनुसार

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या मयत व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची एका वर्षाच्या आत नोंद झालेली नाही,
त्यांची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून विहित फी भरल्यानंतर नोंदणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
भारत सरकारने काढलेल्या राजपत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे तसेच सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुकायक्ष चॉद शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती, त्या मागणीस अखेर यश आले आहे.