अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी उत्कर्ष बाळासाहेब उर्फ विश्वास घुले व आशिष संजय बोरुडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केला आहे.
किरकोळ कारणातून तरुणाला गजाने मारहाण करून तसेच बंदुकीचा धाक दाखवून धमकाविण्याची घटना पाथर्डी बसस्थानकाजवळ घडली होती. या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत.
त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
मूळ फिर्यादी यांच्या वतीने वकील अंकिता सुद्रिक यांनी तर सरकार तर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. घटनेची माहिती अशी की, उदय सखाराम वारुळे हे 20 ऑक्टोंबर 2021 हे पाथर्डी बस्थानकाजवळ सायंकाळी उभे होते.
त्यावेळेस किरकोळ करणावरून आरोपी उत्कर्ष घुले व आशिष बोरूडे यांनी त्यांना जीव मारण्याचे उद्देशाने मारहाण व शिवीगाळ केली.
गजाने मारहाण करून बंदुकीचा धाक दाखविला होता. वारुळे यांनी पाथर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही.
त्यामुळे त्यांनी पाथर्डी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. पाथर्डी न्यायालयाच्या आदेशानुसार पाथर्डी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
दोन्ही आरोपी तर्फे अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दोघांचाही अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.