अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबरला आग लागली होती. त्यावेळी विभागात करोनाचे 17 रूग्ण उपचार घेत होते. आगीच्या घटनेच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला.
तर आता एक एक करत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडं हे सगळं सुरु असताना देखील या प्रकरणातील महत्वाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
जिल्हा रूग्णालयातील आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंभाबाई अंजाराम विधाते (वय 80 रा. बाभूळखेडा ता. नेवासा) असे या रूग्णाचे नाव आहे.
रंभाबाई यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील आगप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सात दिवसांत चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, असे सांगितले होते.
परंतु घटना होऊन 17 दिवस झाले, तरी चौकशी सुरूच आहे. याप्रकरणातील महत्वाचं बाजू म्हणजे मुख्य विद्युत निरीक्षकांचा चौकशी अहवाल प्राप्त होणे गरजेचे आहे. यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील. मात्र हा अहवाल कधी प्राप्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम