अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर वीज वितरण कंपनीने म्हणणे सादर न केले नाही. त्यामुळे ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलली असून शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
डॉ. पोखरणा व जिल्हा रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. तसेच गिरीश जाधव यांच्या हस्तक्षेप अर्जावरही आजच निर्णय होणार आहे.
गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा व डॉ. ढाकणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. डॉ. पोखरणा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेला होता.
तो कायम करण्यासाठी डॉ. पोखर्णा यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे म्हणणे मागवले आहे.
उपअधीक्षक मिटके हे तपासी अधिकारी आहेत. त्यांनी विद्युत निरीक्षकांकडे जळीतकांडाच्या अनुषंगाने म्हणणे मागवले होते. चार वेळेस नोटिसा देऊनही त्यांनी म्हणणे सादर केले नाही.
जिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश ढाकणे यांचे वकीलही सुनावणीला अनुपस्थित होते. त्यामुळे त्यामुळे आज पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच शिवसेनेचे शहर उपप्रमुख गिरीश जाधव यांच्या त्रयस्थ अर्जावरही आज निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम