Ahmednagar News : सन 2023-24 च्या गळीत हंगाम तोंडावर आला असताना कारखान्याकडून दिला जाणारा ऊसाचा भाव पहिला हप्ता म्हणून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रति टन 3200 रुपये प्रमाणे पहिली उचल द्यावी,
अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. तसेच कारखान्याचा बॉयलर पेटवण्यापूर्वी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे केली आहे.

याबाबत पत्रकात मुरकुटे यांनी म्हटले, की कारखान्याने उत्पादित केलेल्या उपपदार्थातून मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग शेतकऱ्यांनाही द्यावा चालू वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत आहे.
दिवाळी सण तोंडावर असताना देखील शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाही, तसेच चालू वर्षी राज्यातील कारखान्यांनी 3000 ते 3200 रुपये टनाप्रमाणे पहिली उचल जाहीर केलेला आहे.
ज्ञानेश्वर कारखान्याने देखील कारखान्याने देखील तीन हजार दोनशे रुपये टनाप्रमाणे पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे.