ईडीची कारवाई द्रारिद्रय रेषेखाली असणाऱ्या लोकांवर होते का?

Published on -

Ahmednagar News : मी ईडीला घाबरत नाही, आ. राम शिंदेना घाबरत नाही, कर्जत तालुक्यात मंजूर झालेली एमआयडीसी आ. राम शिंदेनी रद्द केली, अशा प्रकारच्या वल्गना सध्या आ. रोहित पवार करत आहेत. “प्रत्येक विषयात फक्त आणि फक्त मलाच समजते,

असे विचार करून प्रत्येक विषयावर बोलणारे आ .रोहीत पवार यांना लोकशाही मान्य नाही का? ईडीची कारवाई द्रारिद्रय रेषेखाली असणाऱ्या लोकांवर होते का? असा सवाल भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी करत आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पुढे म्हणतात की, बारामती अँग्रो या खाजगी कारखान्यावर ईडीची धाड पडली, यामध्ये घटनाबाहय ते काय आहे? लोकशाही देशात इडी ही स्वायत्त संस्था त्याचं काम करत आहे. तुमच्या संस्थेत काही काळबेरं नसेल तर तो एक सिस्टिमचा भाग म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

पण अशी कारवाई झाल्यावर माझ्यावर अन्याय झाला म्हणत ऊर बडवण्यात धन्यता मानणारे लोकशाही स्वतःची बटिक समजतात काय? ईडी बाबत ते भाष्य करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

लोकशाही, घटना फक्त आम्हालाच समजते अशा थाटात बोलणारे आमदार महोदय ईडी या तपास संस्थेची स्वायतत्ता मान्य करत नाहीत का? त्यांना लोकशाही मान्य नाही का?

ईडीची कारवाई द्रारिद्रय रेषेखाली असणाऱ्या लोकांवर होते का? सर्वसामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारुन मस्तवाल झालेले राजकारणी, उद्योगपती याच्या वर इडी छापा मारते. निवडून येऊन व सरकारमध्ये राहून निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत स्वतःला हवे तसे नियम बनवायचे आणि गोर गरीब जनतेचा पैसा घशाखाली घालायचा असा गोरखधंदा वर्षानुवर्षे यांचा चालत आला होता.

शेल कंपन्या, सेवाभावी संस्था, हवाला त्याच्या साथीला माफिया असे दुष्टचक्र पंतप्रधान मोदींनी जवळजवळ मोडीत काढलेले आहे, त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेपुढे पुकारा करायचा सोप्पा मार्ग या राजकारण्यांनी निवडला आहे.

ईडीची कारवाई झाल्यावर जनतेत जाऊन ‘मी ईडीला घाबरत नाही” अशी हास्यास्पद विधाने करून स्वतःच्या मनातील भीती कमी करायची आणि स्वतःलाच दिलासा द्यायचा हि मानसिक अवस्था विशेषतः भीतीतूनच येते. तपास संस्था म्हणजे काय शत्रू राष्ट्राने केलेले आक्रमण आहे का?

आपल्याच देशातील तपास संस्थेला का घाबरायचे? काही काळंबेरे केले नसेल तर शांतपणे सामोरे जाणे महत्वाचे असून कारवाई नंतर जे होईल ते जनतेला कळणारच आहे. म्हणून आ. पवार यांनी आपण ईडीला घाबरत नाही असे म्हणत स्वतःला शूर म्हणणे आता थांबवावे.

पवार साहेबानी इडीची नोटिस नसताना ईडी कार्यालयात जाऊन आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याचे झुंडशाही वर्तन या अगोदरच जनतेने पाहिलेले असून ते जनतेला आवडलेले आहे असा समज करून घेऊन तुम्हीही तीच री ओढत “मी इडीला घाबरत नाही” हा जुन्याच नाट्याचा नवीन अंक उघडल्याचे दिसते आहे. यामुळे तुम्हाला सहानुभूती तर मिळणार नाहीच असे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खरमरीत टीका केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe