मंदिरातील दानपेटी फोडली : यापूर्वी प्रयत्न फसला होता

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा शहरातील भरवस्तीत असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास लंपास केली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंदिर पुजारी नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास मंदिराची झाडलोट करण्यासाठी आलो असता, मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या भागाची पाहणी केली व नेवासा पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता,

पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात इसम सदरचे दानपेटी खांद्यावर घेऊन जात असताना निदर्शनास आले. दरम्यान, या अगोदर देखील याच दुर्गादेवी मंदिरातील हीच दानपेटी फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता.

मात्र बाहेर बसलेल्या युवकांनी सतर्कता दाखविल्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न असफल झाला होता. मात्रचोरट्यांनी आता डाव साधला.या घटनेचा पोलिसांनी तात्काळ तपास लावावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe