आठ दिवसात १६ लाखांचे साईबाबांना दान …!५८६ ग्रॅम सोने तर साडेतेरा किलो चांदीचा समावेश

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या २३ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले,

तर या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली. संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी म्हटले, की नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून ७ कोटी ८० लाख ४४ हजार २६५ रुपये देणगी काउंटरद्वारे ३ कोटी ५३ लाख ८८ हजार ४७६ रुपये, ऑनलाईन ४ कोटी २१ लाख ४० हजार ८९३ रुपये अशी एकूण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे.

तसेच सोने ५८६.३७० ग्रॅम (किंमत ३२ लाख ४५ हजार २९५) व चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (किंमत ७ लाख ६७ हजार ३४६) देणगी म्हणून प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.

या कालावधीत साई प्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजारांहून अधिक साईभक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११ लाख १० हजार ६०० लाडु प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे १ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्त झालेले आहेत.

या बरोबरच ७ लाख ४६ हजार ४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन,

संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता चालविण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचे हुलवळे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe