Ahmednagar News : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज डीपीसी बैठक

Published on -

Ahmednagar News : राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली आज सोमवारी (दि.८) जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक संपन्न होणार आहे.

आगामी आर्थिक सन २०२४-२५ सर्वसाधारण प्रारुप आराखडे अंतीम मंजूर करणेकरिता आयोजित करण्यात आलेली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात संपन्न होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४- २५ चे प्रारुप आराखडे अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्याकरिता बुधवारी (दि. १०) राज्यस्तरीय बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा नियोजन समिती बैठक घेण्यात येणार आहे. असे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe