Dr. Bhaskar More : डॉ. मोरेचा जामीन अर्ज फेटाळला ! विनयभंगाच्या गुन्ह्यात केला होता जामिनासाठी अर्ज

Ahmednagarlive24 office
Published:
Dr. Bhaskar More

Dr. Bhaskar More : विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे याचा सोमवारी दि.१८ रोजी दाखल केलेला जामिन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. मोरेच्या अडचणी वाढत आहेत. सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे.

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुमारे ११ दिवस उपोषणास बसले होते. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील उपोषणास बसले होते.

डॉ. मोरे याच्या विरोधात दि.८ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेने दि.१३ रोजी अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा डॉ. मोरे यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर हरीण पाळल्या प्रकरणी डॉ. मोरेला वनविभागाकडुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबधात अटक केली होती.

वनविभागाची चार दिवसांची दि २० पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. सोमवारी दि.१८ रोजी डॉ. मोरे याच्याजामिन अर्जावर मुळ फिर्यादीच्यावतीने अॅड सुमीत बोरा व अॅड अमोल जगताप तसेच सरकारच्यावतीने सरकारी वकील अॅड. संदीप नागरगोजे यांनी बाजु मांडताना न्यायालयासमोर सांगितले की,

डॉ. भास्कर मोरे याने केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर अघात करणारा असुन, समाजातील दुर्बल घटकावर अत्याचार करणारा आहे. सदर आरोपी फरार होण्याची दाट शक्यता आहे तसेच सदर आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

त्यानंतर न्यायालयाने वरील सर्व बाबींचा विचार करून व फिर्यादीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जामखेड न्यायालयाने डॉ. भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला. त्यामुळे भास्कर मोरेच्या कोठडीत मुक्काम वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe