लोणी बुद्रूक येथील युवकांनी केलेल्‍या अभिष्‍टचिंतनाच्‍या सत्‍काराने भारावले खा.डॉ.सुजय विखे पाटील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- तरुणांचे आयडॉल खा.डॉ.सुजय विखे पाटील हे वाढदिवसा निमित्‍त बाहेरगावी असल्‍याने तरुण व इतर कार्यकर्त्‍यांच्‍या शुभेच्‍छांचा स्विकार ते करु शकले नाहीत.

याचे शल्‍य तरुणांना असतानाच बाहेर गावावरुन आपल्‍या लोणी गावात परतल्‍यानंतर तरुणांनी जल्‍लोष करीत गुलाला ऐवजी फुलांची उधळन करीत त्‍यांचा वाढदिवस साजरा करुन, डॉ.विखे पाटील यांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. या सत्‍काराने विखे दाम्‍पत्‍य अक्षरश: भारावून जात त्‍यांनी या सत्‍काराचा विनंम्रपणे स्विकार करीत तरुणाईला धन्‍यवाद दिले.

वाढदिवसाच्या दिवशी बाहेरगावी असल्याने खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या लोणी बुद्रूक येथील चाहत्यांना त्यांचे अभिष्टचिंतन करता आले नाही मात्र दोन दिवस उशिराने पण सदैव स्मरणात राहील अशा थाटात लोणीकरांनी त्यांचा सत्कार केला सुमारे ३८० किलो विविध रंगीबेरंगी फुलांचा पुष्पहार घालून चाहत्यांनी त्‍

यांचे अभिष्टचिंतन केले खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र खा.विखे पाटील वाढदिवसाच्या दिवशी बाहेर गावी असल्याने ते चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारू शकले नाहीत लोणीतील डॉ.सुजय विखे पाटील युवा मंच आणि ग्रामस्थांनी दोन दिवसांनी ते लोणी

येथे येणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या स्वागताची आणि अभिष्टचिंतनाची जय्यत तयारी केली. यावेळी सिनेट सदस्य अनिल विखे, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, किशोर धावणे, लक्ष्मण बनसोडे, रामभाऊ विखे, भाऊसाहेब धावणे, नवनाथ विखे, सोपान विखे, अॅड.नितीन विखे, दादासाहेब म्‍हस्‍के,

प्रभाकर विखे, बाळासाहेब विखे, नवनीत साबळे, भाऊसाहेब विखे, राहुल धावणे, गणेश विखे, रमेश विखे, विनायक भागवत, सनी विखे, शंकर विखे, प्रा.भाऊसाहेब विखे, रंगदर्शन पेंटचे संचालक निलेश विखे, सुबोध विखे, संतोष विखे, सुयोग विखे, विजय पवार, पंकज विखे, लक्ष्‍मीकांत आसावा, आशितोष नेहे, सुरेश वर्पे,

मयुर विखे, ऋषिकेश तांबे,सिध्‍दार्थ मिसाळ आदींसह खा.सुजय विखे पाटील युवा मंचचे कार्यकर्ते आणि ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. गावातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर सायंकाळच्या वेळी आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले ३८० किलो वजनाचा आणि ३८ फूट लांबीचा विविधरंगी फुलांचा भव्य पुष्पहार बनवण्यात आला,

त्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली. पुष्पवृष्टी करण्यासाठी जेसीबी आणण्यात आला, ढोलीबाजा,फटाक्यांची आतषबाजी,चाहत्यांसाठी भगवे फेटे आणि शेकडो कार्यकर्त्यांची हजेरी लक्ष वेधून घेणारी ठरली. खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि सौ.धनश्रीताई विखे पाटील यांना हा भव्य फुलांचा हार घालून जयघोष करीत त्यांचे लोणीकरांनी यांनी अभिष्टचिंतन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!