सिद्धिविनायक मंदिरातही आता ड्रेस कोड लागू

Published on -

२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक देवस्थानांत भक्तांसाठी वस्त्र आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने देखील मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना चपराक लगावणारा निर्णय घेतला आहे. विशिष्ट कोणता पोशाख घालावा, असे बंधन नसले तरीही अंगभर कपडे असावेत, असे या नव्याने लागू करण्यात येणाऱ्या आचारसंहितेत म्हटले आहे.

गणेश दर्शनाला जाताना नेमका पेहराव कसा करावा यावर बंधन नाही, मात्र जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. म्हणजेच समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे नसावेत. तोकडे घालू नयेत, महिला, पुरुषांनी शॉर्ट पँट घालू नये. अंगभर कपडे असलेला पेहराव करावा. भक्ताचा पेहराव मंदिराचे पावित्र्य जपणारा असावा, असा निर्णय सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचे बहुसंख्य भाविकांकडून स्वागत होत आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट न्यासाकडून ड्रेस कोडबाबत एक अधिकृत पत्र काढण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेषात, अंगभर कपडे घालून मंदिरात येणे आवश्यक आहे. या कपड्यांमध्येच मंदिरातप्रवेश दिला जाईल, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असे न्यासाकडून सांगण्यात आले आहे. न्यासाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतील निर्णयाबाबत सदस्यांनी माध्यमांना माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News