रात्रीच्या वेळी आकाशात ‘ड्रोन’च्या घिरट्या ; पोलिसांकडून याबाबत झाला उलगडा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आतापर्यंत नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याचे समोर आले होते. मात्र आता हा प्रकार पुढे देखील चालूच आहे. नुकताच राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आता राहुरी तालुक्यातील आरडगाव, मानोरी, टाकळीमिया परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत आहे. हे ड्रोन चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी उडवले जात असल्याची चर्चा सुरू होती.

मात्र, रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या ‘ड्रोन’ चा उलगडा झाला असून याबाबत लष्करासाठी ड्रोन बनविणाऱ्या कंपनीकडून परिसरात याच्या चाचण्या सुरू असल्याचे चर्चा जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रामीण भागातील ग्रामस्थांची भिती घालवावी अशी मागणी केली जात आहे.

राहुरी पाठोपाठ सोनई व परिसरात दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ड्रोन कोण उडवतं ? कशासाठी उडवत असून त्या मागचा हेतू काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

चोरीच्यादृष्टीने तर हे ड्रोन फिरत नाही ना ? अशी शंका ग्रामस्थांना आहे. ड्रोन परिसरात दिसला की एकमेकांना फोन करून त्याची माहिती एकमेकांना ग्रामस्थ सांगत असून या ड्रोनचा पाठलाग करत आहे. चोरीच्या उद्देशाने चोर टेहळणी तर करत नाही ना? असा संशय नागरिकांना आहे मात्र चोरीची कुठलीही घटना परिसरात घडलेली नाही.
दरम्यान नागरिकांनी याविषयी सोनई पोलीस ठाण्यात चौकशी केली असता आर्मीचा सर्वे चालू असल्याची माहिती मिळाली आहे. हे ड्रोन रात्रीच्या अंधारात उडवून नेमका कुठला डेटा गोळा केला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe