ब्रेक फेल झाल्याने साकत घाटात मालट्रक झाला पलटी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- बीड वरून श्रीगोंदे येथे सरकी घेऊन जाणारा ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने साकत घाटात मालट्रक पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही फक्त सरकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पांगरी ता. शिरूर येथील आजीनाथ दहिफळे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये सरकी अकरा टन माल भरून श्रीगोंदे येथे चालली होती.

साकत घाटात पहिल्या वळणावर अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रक खोल दरीत जाणार हे लक्षात येताच चालकांने प्रसंगावधान राखून ट्रक वळवली त्यामुळे झोला बसून ट्रक रोडच्या कडेला पलटी झाला.

यामुळे ट्रक खोल दरीत जाण्यापासून वाचला व मोठा अनर्थ टळला. ट्रक पलटी झाल्यावर साकत जामखेड रस्त्याने जाणाऱ्या काही प्रवाश्यांनी मदत करत चालकास बाहेर काढून ताबडतोब मालकाला फोन लावला क्रेन मागवले तसेच सरकी भरण्यासाठी दुसरी ट्रक मागवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News