अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एकापेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी पेट्रोल देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणार्या कर्मचार्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी या कर्मचार्यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या युवकास पेट्रोल पंपावरील कर्मचार्याकडून पेट्रोल देण्यास उशीर झाला.
या करणावरून त्या युवकांमध्ये व पेट्रोल देणार्या कर्मचार्यांमध्ये वाद झाले व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये असा हाणामारीचा प्रसंग प्रथमच घडला.
या घटनेची माहिती काही नागरिकांनी लोणी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर लोणी येथील पोलीस घटनास्थळी दाखल होऊन हा वाद रात्री सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम