अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल महावितणाच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाने शेतीचा विज पुरवठा विज रोहिञ बंद करुन खंडीत केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले.
संतप्त शेतकऱ्यांनी दोन तासा नंतरही संबधित अधिकारी विज रोहिञ चालू करीत नसल्याने महावितरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांना उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात कोंडून घेतले.
रजेवर असलेले उप कार्यकारी अभियंता प्रदिप देहरकर यांनी आंदोलकांना सामोरे जावून विज रोहिञ चालू करुण देण्याचे आश्वासन दिले असले तरी सात दिवसाच्या आत विज बिले भरली नाही तर पुन्हा विज रोहिञ बंद करण्यात येईल असा इशाराही देहरकर यांनी दिला आहे.नगराध्यक्ष कदम यांनी पंधरा दिवसाची मुदत मागवून घेतली.
परंतू मुदत वाढ देण्यास नकार दिला. देवळाली प्रवरा शहरातील 119 विज रोहिञांपैकी 40 ते 45 विज रोहिञ विज बिल भरण्यासाठी बंद करण्यात आले होते.संतप्त शेतकऱ्यांनी देवळाली प्रवरा नगर पालिकेत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कानावर हा प्रकार घातला.
उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष कदम यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले साहय्यक अभियंता एस. बी.ठुबे यांनी माझ्या हातात काहि नाही. तुम्ही वरीष्ठांशी चर्चा करा असे सांगितले असता.शेतकरी संतप्त झाले.
एक तासात विज रोहिञ चालू करणार की नाही. याचा खुलासा करावा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.होणाऱ्या आंदोलनास महाविरणाचे कर्मचारी जबाबदार राहतील असे सांगताच साहय्यक अभियंता ठुबे यांनी उप कार्यकारी अभियंता यांच्याशी भ्रमणभाषावरुन संपर्क साधुन शेतकरी आंदोलनाची माहिती दिली.
दरम्यान दोन तासा नंतर हि शेतकरी आंदोलना बाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणाचे कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात डांबवून ठेवले.त्यानंतर राहुरीचे पोलिस उप निरीक्षक एन.बी.सुर्यवंशी आंदोलनस्थळी आले.
महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.संतप्त शेतकरी घोषणाबाजी करत असताना उप कार्यकारी अभियंता प्रदिप देहरकर यांनी आंदोलनस्थळी येवून नगराध्यक्ष कदम यांच्याशी चर्चा केली.चर्चे दरम्यान दोन दिवसात विज बिले भरण्याचे आवाहन देहरकर यांनी केले.
परंतू शेतकऱ्यांनी पंधरा दिवस मुदत मागितली असता देहरकर यांनी सात दिवसाची मुदत देवून विज रोहिञ चालू करण्याचे आश्वासन दिले. संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले की, देवळाली प्रवरा हद्दीतील 119 विज रोहिञा पैकी 29 विज रोहिञ बंद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांवर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टी व अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेले पिके गेली आहेत. सध्या गहू, हरभरा, कांदा पिंकाना पाण्याची गरज आहे. 2003 चा विज कायद्याच्या तरतुदी नुसार नोटीस दिल्या शिवाय विज पुरवठा खंडीत केला जावू शकत नाही.
परंतू महावितरण मनमानी कारभार करत असुन महावितरण विज चोरुन वापरणाऱ्यांना पाठीशी घालत आहे.2013 ते 2017 या कालावधीत शेतकऱ्यांनी न्यालयात दाद मागितली होती.त्या निर्णया नुसार शेतकऱ्यांना एक तृतीयांश बिल भरायचे आहे.तरी विज बिल वसुलीसाठी विज रोहिञ बंद करुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.
असे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले. या आंदोलनात के.मा.पाटील, भारत शेटे,अजित चव्हाण, सुधीर टिक्कल,दिलीप मुसमाडे,मोहसीन शेख, अनिल कदम,शरद होले,बाबासाहेब पठारे,राजेंद्र ढुस,अतुल कदम,मंजाबापू वरखडे,अमोल कदम,संदिप कदम,
शिवाजी कदम,वसंतराव मुसमाडे,संभाजी कदम,मच्छींद्र मुसमाडे,सचिन कोठुळे,भगवान तारडे,सचिन सरोदेनवनाथ काकडे यांच्यासह दोनशे ते तीनशे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम