Ahmednagar Politics : मराठा समाजाचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना मार्गी लावला होता. तो विषय कोर्टातही टिकला होता; मात्र आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. अशी टीका आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
आमदार प्रविण दरेकर यांनी काल साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी खा. संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, राऊत म्हणतात, मी शिवसेना सोडणार नाही.परंतु तुम्हाला कोण म्हणतंय शिवसेना सोडा, उलट आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल, तेवढ्या लवकर शिवसेना संपेल.

त्याच्यामुळे आपण शिवसेना सोडू नये, आणि तुम्ही शिवसेना सोडली तर तुम्हाला भाजपमध्ये नाहीच नाही, परंतु शिंदे गटातदेखील घेणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेण्याचा नैतिक अधिकार खासदार राऊतांना उरला आहे की नाही? हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सांगितले की, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारधारा, तत्वांना कधीच मुठमाती देऊन खासदार शरद पवार यांची विचारधारा स्विकारल्याने राऊत यानी शरद पवार यांची शपथ घ्यावी असा सल्ला कदम यांनी दिल्याचे सांगत राऊत यांनी शिवसेना संपवली असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राचे हित जपणारे सरकार सत्तेत आले आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वोत्तम राज्य व्हावे, अशी साईचरणी प्रार्थना केल्याचे देखील ते म्हणाले.