अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- शेतकर्यांच्या प्रश्नांकडे ना केंद्र सरकारने, ना राज्य सरकारने लक्ष दिले. त्यामुळे शेतकरी एकटा पडला आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या पाठीमागे कोणताही पक्ष नाही.
त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकरवर टीका केली आहे. शेवगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे मंगळवारी शेतकरी मेळावा झाला.
यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना शेट्टी पुढे म्हणाले, एक रक्कमी एफआरपी शेतकर्यांना वरदान ठरते. मात्र, सरकारने त्याचे तीन तुकडे केले आहेत.
एफआरपीचे तीन तुकडे कारखानदारांची सोय आहे. विमा कंपन्या सरकारी अधिकार्यांना हाताशी धरुन पिकं कापणी अहवाल सादर करित आहेत.
त्यामुळे विमा कंपन्या आज नफ्यात आहेत. पालकमंत्री हंस मुश्रिफांबाबत बोलताना शेट्टी म्हणाले कि, जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, महापूरात शेती वाहून गेली.
मात्र पालकमंत्री इकडे आले नसतील कारण ते आमच्याकडचे आहेत. त्यामुळे ते कसे आहेत, हे मला चांगले माहीत आहे, असे सांगत मुश्रीफांवर तोफ डागली.
अतिवृष्टी, महापूर आल्यानंतर पिकांचे काय होते हे सांगण्याची गरज नाही. नैसर्गिक आपत्तीनंतर पूरग्रस्तांना केंद्र व राज्य सरकारने आदेश देऊन 25 टक्के तातडीने विम्याचा हप्ता द्यायला हवा होता. वास्तविक विमा कंपन्या सरकारचे ऐकायला तयार नाहीत. शेतकर्यांवर अस्मानी नाही तर सुलतानी संकट आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम