अवकाळी पावसामुळे पाठीवर बिऱ्हाड घेऊन जगणाऱ्या ऊसतोड मजुरांचे होतायत हाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  राज्यासह नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, जिल्ह्यात ऊस पीक जास्त असल्याने जोमाने तोडणी सुरू होती.

परंतु गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ऊसतोड बंद झाली आहे. जीवन जगण्यासाठी ऊसतोड मजूर इतर राज्यातून आपल्या कुटुंबासमवेत आले आहेत.

एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे,तर दुसरीकडे बदलत्या ‌हवामानामुळे कधी पाऊस, कधी थंडी तर कधी ऊन अश्या एकत्रित हवामानाचा अनुभव येत आहे.

या पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतांनाचे दिसत आहे. त्याच बरोबर जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

तसेच ऊस वाहतुकीसाठी बैलांचे व गाडी मालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, ऊस तोड करणाऱ्या महिलांनाही मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान अवकाळी पावसाने दोन-तीन दिवसांपासून हजेरी लावल्याने अनेक ऊसतोड मजुरांच्या झोपडीच्या परिसरात पाणी साचले आहे. परिणामी परिसर चिखलमय झाल्याने ऊसतोड मजुरांना झोपडीत बसून राहण्याची वेळ आली आहे.

शेतात पाणी राहिल्याने ऊसतोड बंद झाली आहे. असे झाल्यास आपला जीवनाचा गाडा कसा, चालवावा असा, प्रश्न ऊसतोड मजुरांना पडला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!