डंपरची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू तर मुलगा जखमी

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेतीचे कामे आवरून मोटारसायकलवरून घरी परतणाऱ्या मायलेकाच्या मोटारसायकलला भरधाव वेगातील डंपरने जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव- सोनेवाडी रस्त्यावर, नऊचारी वस्सल मॉडेल स्कूलजवळ घडली. दरम्यान यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी येणारी रुग्णवाहिका खडीकरण झालेल्या रस्त्यावर उलटली.

याबाबत अधिक माहिती अशी, शेतीचे कामे आवरून वंदना रामदास वाघ व तुषार रामदास वाघ हे दोघे मायलेक स्कुटीवरून नऊचारी परिसरातून पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता. दरम्यान रस्त्यावर नऊचारी ओलांडून त्यांची स्कुटी रोडवर आली असता सोनेवाडीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्या मायलेकाच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.

यामध्ये वंदना रामदास वाघ (वय ४८ वर्षे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही भयंकर होती. पोहेगाव सोनेवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले. शिर्डी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह राहाता ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली.

परंतु हि रुग्णवाहिका झगडे फाटा मार्गे नऊचारीकडे येत असताना पाऊस झाल्याने आणि रस्त्यावर खडी असल्यामुळे पलटी झाली. सुदैवाने चालकाला काही झाले नाही. त्यानंतर दुसऱ्या रुग्णावाहिकेने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

पोहेगाव परिसरातील ही अपघाताची दुसरी घटना असून संगमनेर कोपरगाव रोडवरही मोटरसायकल व मोटरसायकलचा अपघात होऊन यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

नऊचारी परिसरातील अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने मारहाण होईल या धास्तीने तेथून पळ काढला. या डंपर चालकाचा मालक व चालक कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत. सोनेवाडी व पोहेगाव येथील बाजार तळ व नगदवाडी परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हा डंपर घटनास्थळावरून पळून जात असताना कैद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe