अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात रात्री तसेच दिवसा देखील चोरीच्या घटना घडत आहेत . त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत. मात्र आता जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावात अत्यंत विचीत्र प्रकार घडत आहे. यामुळे ते कुटुंबच नव्हे तर आसपासचे शेजारी तसेच पोलीस देखील या अनोख्या प्रकाराने चक्रावून गेले आहेत.
पाहूया नेमका काय प्रकार घडत आहे, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे मोहन केशव पुजारी हे कुटुंब रहातात. दरम्यान मागील आठ दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर अचानक कोठूनतरी दगड येत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला मात्र त्यानंतर दगडे येणे बंद झाली. परंतु त्यानंतर आता अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या आहेत.

घरातील गादी, उशी, प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला. थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू देखील जळाल्या. या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले.
त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या तसेच त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजाऱ्यांच्या घरात ठेवल्या परंतु त्यानंतर काही वेळातच ग्रामस्था समक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला. त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले.
दरम्यान ही घटना समजतात श्रीरामपूर शहर पोलीस तसेच अनिसचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले व पुजारी कुटुंबीयांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चितच शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबीयांना दिले. मात्र याबाबत जसे जसे नागरिकांना माहित होत आहे तसे ही घटना पाहण्यआसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते.