शेती व दुग्ध उत्पादन खा. सुजय विखेंचा उत्पनाचा सोर्स ! जनावरे, दागिने, शेअर्स.. टोटल किती आहे संपत्ती? पहा..

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खा. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. यावेळी भव्य शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची व पत्नी धनश्री विखे यांची एकूण संपत्ती २९ कोटी १८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या व पत्नीच्या नावावर एकही वाहन नाही.

सुजय यांच्याकडे ५४१ ग्रॅम सोने असून, त्याचे बाजारमूल्य ३५ लाख ३३ हजार ५१३ रुपये आहे. पत्नीकडे ६९० ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमूल्य ४५ लाख १० हजार १०१ रुपये आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम १ लाख ५४ हजार ६९२ रुपये आहे, तर पत्नीकडे ८२ हजार २८६ रुपये आहेत.

२०२४ मधील संपत्ती

२०२४ च्या शपथपत्रात सुजय यांच्याकडे १० कोटी ९५ लाख जंगम व १२ कोटी १५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीकडे ३ कोटी ८८ लाख रुपयांची जंगम व १ कोटी १९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

दोन अवलंबित व्यक्तींकडे ४९ लाख २५ हजारांची जंगम मालमत्ता तर ५० लाखांची स्थावर मालमत्ता आहे. ही एकूण मालमत्ता २९ कोटी १८ लाख ८९ हजार आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांची मालमत्ता १२ कोटी ३२ लाखाने वाढली आहे.

उत्पन्नाचा स्त्रोत

सुजय विखे : पगार, कृषी उत्पन्न, व्याज व दुग्ध उत्पादन व विक्री, भत्ते.

पत्नी : व्यवसाय सल्लागार, शेती, ठेव व बँक व्याज, दुग्ध उत्पादन.

चाळीस हजारांची जनावरे

शेती व दुग्ध उत्पादन हा डॉ. सुजय विखे यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यांच्याकडे १० लाख ३७ हजारांची शेती औजारे असून ४० हजार रुपयांची जनावरे आहेत.

दोन ठिकाणी घर

सुजय विखे यांच्या नावावर अर्जातील पुणे जिल्ह्यातील कल्याणीनगर, येरवडा येथे २४८५ चौ. फूट व लोणी (राहाता) येथे ६०, ९८४ चौ. फूट जागेवर घर आहे.

सुजय विखे संपत्तीचे प्रकार

१) बँक ठेव ५ कोटी ५७ लाख

२) शेअर्स, म्युच्युअल फंड ११ लाख ६ हजार

३) कर्ज ४ कोटी ६५ लाख

४) जमीन २६ एकर

५) आयुर्विमा गुंतवणूक १३ लाख ५६ हजार