शिवसेना पक्ष जिल्ह्यासह राज्यात एक नंबर करण्यासाठी प्रयत्न – साजन पाचपुते

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना पक्षाचे नगर जिल्ह्यासह राज्यात संघटन वाढविण्यासाठी सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन जोमाने काम करत येणाऱ्या काळातील निवडणुकामध्ये पूर्ण ताकतीने उतरत शिवसेना पक्ष जिल्ह्यासह राज्यात एक नंबर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनी केले.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घेतलेल्या शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना साजन पाचपुते यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरत

शिवसेना पक्ष राज्यात नंबर एकवर आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. तसेच सर्व पदाधिकारी यांना पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना देत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला.

तालुक्यातून असलेल्या शिवसैनिकांच्या सूचना आणि अडचणी यावेळी जाणून घेत बूथ प्रमुख नेमण्याच्या सूचना दिल्या आणि नगर जिल्ह्यात बोलघेवड्या आणि फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी सुरू असलेला होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम जनतेत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना दिल्या.

श्रीगोंदा तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्यासाठी सर्व शिवसैनिक तन-मन-धनाने कामाला लागणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी सांगितले.

यावेळी सुरेश देशमुख, संतोष खेतमाळीस, निलेश साळुंखे, रावसाहेब डांगे, अनिरुद्ध पावशे, ओमकार शिंदे, राजू तोरडे, सुनील शिंदे, चंद्रकांत धोत्रे, नितीन शिंदे, सुदाम सावंत, विजय सावंत, जमीरभाई शेख, रोहिदास मस्के, विनोद अधुरे, प्रवीण खेतमाळीस,

चिमणराव बाराहाते, शिवाजी समदडे, रघुनाथ सपकाळ, जनाबाई गायकवाड, अनिकेत मांडे, कृष्णा भालेराव, दादासाहेब मुंडेकरी, शरद नागवडे, बाबासाहेब चोरमले, संभाजी पाचपुते, सोनू पवार, दिलीप आनंदकर, सागर खेडकर यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe