नगरच्या उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो कोसळला : भीषण अपघात

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो पुलाच्या संरक्षण जाळ्या तोडून खाली पडला. नगर पुणे रोडवरील चांदणी चौकात हा अपघात घडला आहे. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

सुदैवाने यावेळी पुलाच्या खाली फारसी गर्दी नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरात नगर पुणे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर उड्डाण पुल उभारण्यात आला आहे. या पुलाची लांबी अवघी साडेचार किमी आहे. सक्कर चौक ते कोठला या मार्गावर हा पूल आहे.

मात्र चांदणी चौकात या उड्डाण पुलाला अत्यंत धोकादायक वळण आहे. या वळणावर या पूर्वी देखील पुलावरून वाहनचालक खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी पुलाच्या दोनी बाजूने संरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र आज परत त्याच वळणावर आयशर टेम्पो उड्डाणपूलावरून खाली पडला आहे.

अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या नगर सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे. याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी या उड्डाणपूलावरून खाली पडले आहेत.

ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चार चाकी खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचे असल्याचे अनेक वेळा निदर्शनास येऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत.

या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत . दरम्यान या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर अली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe