AhmednagarLive24 : कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे गावातील एका वस्तीवर दरोडा टाकण्यात आला आहे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला असून दोन-तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. घराच्या छतावर झोपलेले असताना दरोडेखोरांनी दोघांचाही खून केला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे नातेवाईक संपर्क करीत होते, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता.
आजूबाजूला वस्ती नसल्याने इतरांच्याही लक्षात आले नाही. शेवटी नातेवाईकांनी वस्तीवर येऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.