निवडणुकीची रणधुमाळी ! पारनेर, कर्जतसह अकोले, शिर्डीत उद्या फेरसोडत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Election) 

अकोले, शिर्डी, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसींच्या आरक्षीत असलेल्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी होत आहेत.

या निर्णयामुळे या जागेतील सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत ठेवावयाच्या जागांसाठी गुरूवार दि. 23 डिसेंबर 2021 रोजी सुधारित फेरसोडत होत आहे.

या नगरपंचायतींसाठी प्रत्येकी 4 जागा ओबीसींसाठी आरक्षीत होत्या. पण आता या जागांवर खुल्या प्रवर्गातील पुरूष 2 आणि महिलांसाठी दोन जागा येणार आहेत.

शिर्डीकर पेचात… शिर्डी नगरपंचायत नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी शिर्डीकरांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर नगरपरिषद करण्याची घोषणाही झाली.

मात्र तरीही नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या दरम्यान दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. दरम्यान हे दोन्ही उमेदवार बिनविरोध होणार असून मंगळवारी येथे मतदान झाले नाही.

आता शिर्डीतील ओबीसींच्या चार जागा खुल्या प्रवर्गासाठी होत आहे. त्याचे सुधारित फेरसोडत होत आहे. त्यानंतर या जागांची निवडणूक होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News