अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- नगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवार (दि.16 फेब्रुवारी) ऐवजी निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या निवडीच्या सभेच्या पिठासीन अधिकारीपदी असतील.
दरम्यान स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान स्थायी समितीत 16 सदस्य असतात.

त्यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले होते. या रिक्त जागांवर मागील आठवड्यात महापालिकेच्या विशेष सभेत नियुक्ती करण्यात आली.
तसेच ऐनवेळी सभापती अविनाश घुले यांनी समिती सभापतिपदासह सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या नवव्या जागेवरही नियुक्ती करण्यात आली.
त्यामुळे समितीत पूर्ण 16 सदस्य झाले आहेत. रिक्त जागांवरील नियुक्त्या केल्यानंतर प्रशासनाने सभापतिपदाच्या निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता.
विभागीय आयुक्तांनी यासाठी निवडणूक जाहीर केली असून, शुक्रवार ही निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.
उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याचा कार्यक्रम ते जाहीर करतील. दाखल अर्जांची छाननी आणि माघार या प्रक्रिया निवडणुकीच्या सभेत होत असतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम